नंदुरबार / सप्त नगरी न्युज नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाची सांगता आनंदराव महाराज बोरकुंडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात झाली. या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. उमर्दे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पंचअग्नी आखाड्याचे महंत सोमेश्वरानंदजी ब्रम्हचारी यांच्या आशीर्वादाने व आनंदराव महाराज बोरकुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली […]
नंदुरबार
नेमसुशिल समूहात पोलीस प्रशासन मार्फत मार्गदर्शन शिबीर व प्रतिज्ञा
तळोदा / सप्त नगरी न्युज तळोदा- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले त्यात बाल गुन्हेगारी, ऑनलाईन चिटिंग, मांजा प्रतिबंध, सायबर क्राईम इत्यादी विषयावर संबोधन करण्यात आले प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया, हवालदार विजय सोनवणे,पोलीस नाईक अनिल पाडवी, मुख्याध्यापिका पुष्पा बागुल यांची उपस्थिती होती.यावेळी पोलिस निरीक्षक […]
भारतीय जनता युवा मोर्चाच्या नंदुरबार जिल्हा महामंत्री पदी तळोद्याचे उमेश विजय सोनवणे यांची निवड
नंदुरबार / सप्त नगरी न्युज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, नंदुरबार जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणीला गती देत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री.प्रशांत शांतीलाल पाटील यांनी नुकतीच नवीन कार्यकारिणीतील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये तळोदा येथील युवा कार्यकर्ते उमेश विजय सोनवणे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही निवड […]
चिंचपाडा येथे रेल्वे गेटजवळील समस्यांबाबत उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी भेट, स्थळ पाहणी
नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा गावातील रेल्वे गेटजवळील काही प्रलंबित मागण्या व नागरिकांच्या दैनंदिन अडचणींबाबत उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी रस्ते वाहतूक, सुरक्षितता, वाहतुकीतील अडथळे तसेच गेटमुळे होणाऱ्या विलंबासंदर्भातील समस्या मांडल्या. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्यांची सविस्तर माहिती घेतली आणि संबंधित विभागांकडून तातडीने उपाययोजना करण्याबाबत आवश्यक सूचना […]
नेमसुशिल समूहात क्रीडा महोत्सवाचे आयोजन
तळोदा- शहरातील नेमसुशिल समूहाचा दोन दिवसीय क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून से.नि.मुख्याध्यापक दत्तात्रय सूर्यवंशी प्राचार्य अमरदीप महाजन तालुका क्रीडा संयोजक सुनिल सूर्यवंशी मुख्या.मिलिंद कुमार धोदरे संस्थाध्यक्ष निखिलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल संस्था समन्वयक हर्षिलभाई तुरखीया मोती बँकेचे मॅनेजर वसंत पाटील व नितीन वाणी व […]
शेठ. के. डी. हायस्कूलात “स्वास्थ्य सहेली” उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना जीवन कौशल्य प्रशिक्षण; मेट्रोपोलीस फाउंडेशन आणि भारत केअर्सच्या संयुक्त स्तुत्य उपक्रम
तळोदा येथील शेठ. के. डी हायस्कूलमध्ये मेट्रो पोलीस फाउंडेशन आणि भारत केअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या स्वास्थ्य सहेली या प्रोजेक्ट अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी एक दिवसीय विशेष जीवन कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून शाळेचे मुख्याध्यापक जे एल सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक जे एन माळी, पर्यवेक्षक पी पी पाटील उपस्थित होते. […]
नंदुरबार जिल्हा मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या अध्यक्षपदी किशोर साळुंखे
नंदुरबार जिल्हा मराठा समाज परिवर्तन चळवळच्या अध्यक्षपदी नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील किशोर साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. मराठा समाज परिवर्तन चळवळची बैठक तळोदा तालुक्यातील मोहिदा येथे श्यामकांत सोमवंशी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व समाज बांधवांनी एकमताने किशोर साळुंखे यांची निवड केली. मावळते अध्यक्ष युवराज मुदगल यांनी त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्त केला.या बैठकीस […]
वनस्पतीशास्त्र विषयाची तळोद्यात अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष वनस्पतीशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्नदिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्ट्स कॉमर्स […]
तळोदा तालुक्यात सततच्या गारठ्याने गहू पेरणी अंतिम टप्प्यात.
तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा पुनर्वसन,प्रतापपूर, चिनोदा, मोहिदे, तळवे, मोड, बोरद परिसरात गहू पेरणी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र असून सध्या तालुक्यात चांगलाच गारठा असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांकडून पेरणीस वेग देण्यात येत आहे.दरम्यान शेतकरींकडून कापूस वेचणी, खोडवा ऊसाची तोड करण्यात येऊन लगेच शेतीची मशागत करण्यात येत असून ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी यंत्राद्वारे गहू पेरणी करण्यात येत आहे. पेरणी […]
तरस चा रात्रीच्या सुमारस मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला तळोदा शहरा लगत चंदन विला परिसरात तरस चा मुक्त संचार…
तळोदा शहरा लगत चंदन विला परिसरात तरस चा मुक्त संचार… तरस चा रात्रीच्या सुमारस मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला… तळोदा येथील हातोडा रस्त्यावर चंदन वीला वसाहत व रुग्णालय व कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ परिसरात तरस चा रात्रीच्या सुमारास मुक्त संचार सुरू आहे. तरस मुक्त संचार करतांना दृश्य मोबाईल कॉमेऱ्यात कैद केले आहे. तळोदा […]










