तळोदा येथील शेठ. के. डी हायस्कूलमध्ये मेट्रो पोलीस फाउंडेशन आणि भारत केअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या स्वास्थ्य सहेली या प्रोजेक्ट अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी एक दिवसीय विशेष जीवन कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून शाळेचे मुख्याध्यापक जे एल सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक जे एन माळी, पर्यवेक्षक पी पी पाटील उपस्थित होते. तसेच या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन जयश्री कोळी व भाग्यश्री सांजराय यांनी केले. या प्रशिक्षणाच्या उद्देश मुलींना शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम बनविणे हा होता. यावेळी या कार्यक्रमाचे महत्त्व व प्रास्ताविक पर्यवेक्षक पी पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट करून दिले धकाधकीच्या जीवनात आणि वाढत्या वयात मुलीं समोर येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली जीवन कौशल्य आत्मसात करणे का गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला. यावेळी जयश्री कोळी यांनी मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर असलेल्या गुड टच आणि बॅड टच यावर विशेष भर त्यांनी दिला. केवळ तोंडी माहिती न देता प्रात्यक्षिक द्वारे त्यांनी शरीराच्या सुरक्षित भागाची आणि धोक्याच्या सूचनांची जाणीव मुलींना करून दिली. तसेच स्वसंरक्षणाचे धडे आणि कोणत्याही अनुचित प्रकारास वेळेत कसा विरोध करावा याबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली असून त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. मेट्रोपोलीस फाउंडेशन आणि भारत केअर्स यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे शाळेच्या प्रशासनाने आणि स्थानिक पालकांनी कौतुक केले आहे. हा प्रोजेक्ट तळोदा येथील किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. यावेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक आर एन कोकणी, पी एम वानखेडे, एस एस ठाकरे, सी के इंगळे,
एन डी मोरे,आर आर पाडवी यांसह शाळेच्या शिक्षिका सौ.जी.आय चौधरी, सौ.एस बी वसावे, सौ.ए.डी. पाडवी, सौ.जे.आय राणे, यांसह शाळेच्या पाचवी ते सातवी च्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रिएटिव्ह थिंकिंग आणि क्रिटिकल थिंकिंग:
समस्या निवारणासाठी नावन्यपूर्ण संकल्पना सुचवणे आणि कोणत्याही परिस्थितीच्या चिकित्सकपणे विचार करणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच भावभावना समजणे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखून त्या योग्य प्रकारे व्यक्त करण्याचे देखील प्रशिक्षण यावेळी विद्यार्थिनींना देण्यात आले. तसेच ताण-तणाव हाताळणे यामध्ये अभ्यास आणि दैनंदिन जीवनातील ताण प्रभावीपणे कसा कमी करावा यावर देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात करून उपाय सुचवण्यात आले.






