नंदुरबार / सप्त नगरी न्युज
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, नंदुरबार जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणीला गती देत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री.प्रशांत शांतीलाल पाटील यांनी नुकतीच नवीन कार्यकारिणीतील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये तळोदा येथील युवा कार्यकर्ते उमेश विजय सोनवणे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही निवड भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. अनुप जी मोरे यांच्या आदेशानुसार आणि भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी व भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शहादा तळोदा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी यांच्या मान्यतेने मार्गदर्शनाने करण्यात आली आहे.
या सोहळ्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, प्रदेश सदस्य प्रा. पंकज पाठक, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, सुदाम चौधरी यांच्यासह पक्षाचे जिल्हा स्तरावरील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री.उमेश भैय्या सोनवणे यांनी पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून, जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन उभे करण्याचा मानस व्यक्त केला.जिल्हा महामंत्री पदी निवड झाल्याबद्दल राजकीय, सामाजिक आणि मित्र परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील वाटचालीस त्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.






