नंदुरबार

नंदुरबार जिल्हा मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या अध्यक्षपदी किशोर साळुंखे

नंदुरबार जिल्हा मराठा समाज परिवर्तन चळवळच्या अध्यक्षपदी नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील किशोर साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. मराठा समाज परिवर्तन चळवळची बैठक तळोदा तालुक्यातील मोहिदा येथे श्यामकांत सोमवंशी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व समाज बांधवांनी एकमताने किशोर साळुंखे यांची निवड केली. मावळते अध्यक्ष युवराज मुदगल यांनी त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्त केला.
या बैठकीस चळवळीचे मुख्य समन्वयक श्री विठ्ठल मराठे, प्रा. रविंद्र कदम, धनराज मराठे, प्रा.भगवान चिने, वामन चव्हाण, शामकांत सूर्यवंशी, नंदराव कोते,शिरीष जगजाळ, योगेश चौधरी, विजय कदम,संजय बोराणे, संजय तनपुरे, सुनील पवार,लोटन मराठे, भरत चव्हाण, लोटन शिंदे, सुभाष चव्हाण,अरविंद साळुंखे यासह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किशोर साळुंखे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *