धाराशिव : तुळजापुरातील तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यात पेटलेला वाद थेट आता खंडणीपर्यंत येऊन पोहोचला आहे. मंडळ अधिकाऱ्यानेे तहसीलदारांनी शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद करताच तहसीलदारांनीही मंडळ अधिकाऱ्याने खंडणी मागितल्याची तक्रार दिली. यावरून दोघांविरुद्धही गुन्हे दाखल झाल्याने महसूल विभागातील नवा वाद चव्हाट्यावर आला. तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. येथील मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी […]

