मुंबई/उरण : उरण-नेरूळ आणि बेलापूर मार्गावरील लोकल सेवांचा विस्तार लवकरच होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. नेरूळ-उरण-नेरूळ ४ आणि बेलापूर-उरण-बेलापूर ६ अशा एकूण १० अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. तरघर आणि गव्हाण ही नवी स्टेशन मंजूर झाल्याचेही सांगितले. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू […]

