गडचिराेली : आरमोरी वनपरिक्षेत्रातील विहीरगाव नियत क्षेत्रात साेमवार, ८ डिसेंबर राेजी एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वडसा वन विभागात वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहेत. वाघाचा मृतदेह अत्यंत विकृत अवस्थेत असल्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. विहीरगाव नियत क्षेत्रात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. तेव्हा वडसाचे उपवनसंरक्षक वरुण […]

