नाशिक : कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या छोटू वडापावच्या दुकानात बुधवारी (दि. १०) रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका झाला क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. आगीच्या ज्वाला इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने चार ते पाच दुकानांना हानी पोहचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. कॉलेज […]

