बुलढाणा नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी आज, २ डिसेंबर २०२५ रोजी सुरू असलेल्या मतदानादरम्यान बोगस मतदानाचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळा आणि आयटीआय मतदान केंद्रांवर मयत झालेल्या तसेच बाहेरगावी गेलेल्या मतदारांच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला बोगस मतदान करताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले होते. त्याला […]

