दोडामार्ग : मागील तीन महिन्यांपासून गोवा राज्यात व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास डोंगरपाल गावातून तो कळणे परिसरात दाखल झाला. या अनपेक्षित पुनरागमनामुळे हत्तीबाधित गावातील ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. एकीकडे गणेश टस्कर व दुसरीकडे ओंकार हत्ती दाखल झाल्याने वनविभागाची मात्र डोकेदुखी वाढली […]

