

तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा पुनर्वसन,प्रतापपूर, चिनोदा, मोहिदे, तळवे, मोड, बोरद परिसरात गहू पेरणी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र असून सध्या तालुक्यात चांगलाच गारठा असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांकडून पेरणीस वेग देण्यात येत आहे.
दरम्यान शेतकरींकडून कापूस वेचणी, खोडवा ऊसाची तोड करण्यात येऊन लगेच शेतीची मशागत करण्यात येत असून ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी यंत्राद्वारे गहू पेरणी करण्यात येत आहे. पेरणी यंत्रामुळे बियाणे एकाच खोलीवर,योग्य अंतरावर व समान प्रमाणात पेरले जात असल्याचे सांगण्यात येत असून पेरणी यंत्राच्या साहाय्याने पेरल्यामुळे उगवण क्षमताही चांगली राहत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच पेरणी यंत्राद्वारे बियाण्यासोबत खतही देण्यात येत असल्याने वेळेचेही बचत होत असून लगेचच गहू पिकाला पाणी देणेही सोयीचे होत आहे.
गहू पिक120 ते 140 दिवसात परिपक्व होत असल्याने शेतकऱ्यांकडून अद्यापही गहुचा पेरा सुरूच असून यंदा थंडी टिकून राहील असेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
यंदा पर्जन्यमान चांगले झाले असल्याने यंदा थंडी राहील. तसेच विहिरी,कूपनलिकांची पाणीपातळी टिकून राहणारअसून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गहू पेरणी करण्यास हरकत नाही.
प्रा. डॉ. योगेश मराठे
गहू उत्पादक शेतकरी
रांझणी.






