शिराळा : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर पुणे येथील नंदिनी जितेंद्र मेणकर हिने जलतरण, ट्रायथलॉन, वॉटर पोलो यांसारख्या अत्यंत कठीण स्पर्धांमध्ये आतापर्यंत तब्बल ११४ पदकांची कमाई केली. नुकत्याच श्रीलंका येथे झालेल्या वॉटर पोलोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. यासंघात नंदिनीचा समावेश होता. नंदिनीच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र आणि देशाचे नाव उंचावले आहे. नंदिनीचे आजोळ सांगली जिल्ह्यातील शिराळा आहे. […]

