कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष वनस्पतीशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न
दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्ट्स कॉमर्स कॉलेज ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री रोहित भाऊ माळी होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ एम. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हेमंत दलाल, पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील उपस्थित होते सदर कार्यशाळेत अभ्यासक्रमातील एकूण पंधरा विषयांवर चर्चा करण्यात आली व अभ्यासक्रम तयार करण्यात आला विविध विषयांचे अध्यक्ष सदस्य उपस्थित होते तसेच अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ विद्या पाटील डॉ गीता पाटील डॉ संभाजी पाटील डॉ एस एस पाठक डॉ तनवीर खान डॉ प्रेम कुमार गौतम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ एम. जी. पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती मातीचे पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ महेंद्र माळी यांनी मांडले सूत्रसंचालन डॉ सुनीता गायकवाड यांनी केले उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करत महाविद्यालयातील आयोजकांचे व्यवस्थेचे विशेष कौतुक केले सदर कार्यशाळे प्राध्यापकांची उपस्थिती लक्षणीय ठरली सुमारे धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील 90 प्राध्यापकांनी आपली उपस्थिती दर्शविली उपस्थिताचे विशेष आभार मानण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ एस एन शर्मा डॉ एस आर गोसावी डॉ एस बी गरुड प्रा. एल एन पाटील कार्यालयीन अधीक्षक श्री मनीष कलाल प्रयोगशाळा सहाय्यक श्री अश्विन मगरे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व आभार प्रदर्शन डॉ महेंद्र माळी यांनी केले.






