जव्हार/मोखाडा : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठेकेदारांची जमा असलेला १११ कोटी ६३ लाखांचा निधी हा खोटा धनादेश आणि बनावट सह्यांच्या मदतीने हडपण्याचा डाव एसबीआय शाखा जव्हारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे उधळला आहे. शुक्रवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी जव्हार पोलिसांत तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक तथा विक्रमगडचे विद्यमान नगराध्यक्ष नीलेश ऊर्फ […]

