नंदुरबार जिल्हा भाजपा किसान मोर्चा महामंत्री पदी मोड येथील प्रवीणसिंह भटेसिंह राजपूत यांची निवड करण्यात आली निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार व भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, नंदुरबार किसान मोर्चा जिल्हा महामंत्री पदी प्रवीणसिंह भटेसिंह राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती नंदुरबार जिल्हा भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नीरज महेंद्र सुरेश पाटील यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असाल यासह भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येय, धोरण सर्व सामान्य लोकांपर्यंत आपण पोचविण्याकरीता व संघटन वाढीसाठी आपण प्रयत्नशील असाल यासाठी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. प्रवीणसिंह राजपूत यांनी नियुक्ती पत्र महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते प्रदान केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी आदी उपस्थिती होते.





