अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शंकर आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे बहुप्रतिक्षीत खापर ते आमलीफळी रस्त्याच्या देहली नदीवरील पुलाचे भुमिपुजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तसेच आमलीफळी ते चांदपूर रस्त्याच्या काकड नदी वरील पुलाचे तसेच कोराई भाट्याफळी येथे अंगणवाडी केंद्राचे भूमिपूजन देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी अक्कलकुवा पंचायत समितीचे माजी उप सभापती सुरेश जैन, शेतकरी सह संघांचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम वळवी, युवा सेना लोक सभा प्रमुख ललित जाट, शिवसेना जिल्हा संघटक जगदीश चित्रकथी, योगेश सोनार, शहर प्रमुख रवी पाडवी, सरपंच वसंत वसावे, निता माळी, सरला वळवी, रविंद्र पाडवी, रविंद्र चौधरी, तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, खापर, आमलफळी, चांदपुर येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.






