शिक्षणाच्या मंदिरातच एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘तू आमचा टेबल का तोडला? असा प्रश्न विचारत नेवासा तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेतील चार शिक्षकांनी सातवीच्या एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या जबाबावरून सोनई […]
पश्चिम महाराष्ट्र
व्हिडीओ बनवून तृतीयपंथीयानं संपवलं जीवन, म्हणाली…
सोलापुर : एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधातून धोका मिळाल्याने प्रकाश व्यंकप्पा कोळी उर्फ स्वीटी (वय, २२) या तृतीयपंथी व्यक्तीने गुरुवारी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी स्वीटीचा प्रियकर सुजित अप्पासाहेब जमादार (वय, २३) याला पोलिसांनी हळदीच्या मंडपातून अटक केली. स्वीटी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेला सुजित जमादार यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात […]
सोन्याची बिस्किटे वाटून घेऊ म्हणत वृद्धेचे गंठण लांबविले
सातारा : सोन्याचे बिस्कीट सापडले आहे, ते सर्वांनी वाटून घेऊ, असे म्हणत एका वृद्धेचे गळ्यातील सुमारे दोन लाखांचे अडीच तोळ्यांचे गंठण चोरून नेले. ही घटना ७ रोजी सकाळी ११ वाजता राधिका रस्त्यावरील कदम पेट्रोलपंपासमोर घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताबाई भाऊ देवकर (वय ६०, रा. देवकरवाडी, निगडी, ता. सातारा) या कदम पेट्रोल पंपासमोरून चालत निघाल्या […]
शिराळ्याच्या नातीची ऐतिहासिक कामगिरी; नंदिनी’ने जलतरण, ट्रायथलॉन स्पर्धेत आतापर्यंत केली ११४ पदकांची कमाई
शिराळा : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर पुणे येथील नंदिनी जितेंद्र मेणकर हिने जलतरण, ट्रायथलॉन, वॉटर पोलो यांसारख्या अत्यंत कठीण स्पर्धांमध्ये आतापर्यंत तब्बल ११४ पदकांची कमाई केली. नुकत्याच श्रीलंका येथे झालेल्या वॉटर पोलोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. यासंघात नंदिनीचा समावेश होता. नंदिनीच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र आणि देशाचे नाव उंचावले आहे. नंदिनीचे आजोळ सांगली जिल्ह्यातील शिराळा आहे. […]
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड…
पुण्यासह महाराष्ट्रात १०३-१०४ रुपयांच्या पुढेच पेट्रोलचे दर आहेत. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी इंधनाचे दर मात्र कमी झालेले नाहीत. अशातच इथेनॉल मिक्स करून झाले, तरीही सरकारने पैसे कमी केलेले नाहीत. परंतू, आज अचानक पुण्यातील कोथरुडमधील एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना प्रति लीटर पेट्रोल मिळू लागल्याने मोठी झुंबड उडाली होती. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद […]
नाशिकच्या कॉलेजरोडवर आगडोंब; पाच दुकाने बेचिराख, कोणतीही जीवितहानी नाही
नाशिक : कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या छोटू वडापावच्या दुकानात बुधवारी (दि. १०) रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका झाला क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. आगीच्या ज्वाला इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने चार ते पाच दुकानांना हानी पोहचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. कॉलेज […]
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्याचा मेल तपास पथक श्वानासह तपास पथक दाखल
कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला असून दुपारी दोन वाजेपर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे असा मेल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अकाउंट वर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तातडीने बॉम्ब शोध पथक आणि श्वानपथक दाखल झाले असून पोलीस आणि कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानही दाखल झालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दालना समोरून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून या ठिकाणी प्रत्येक कक्षाची, […]
शैनेश्वर देवस्थान बनावट ॲप प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक
अहिल्यानगर – शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथील बनावट ॲप प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिराने अटक केली. सचिन अशोक शेटे व संजय तुळशीराम पवार , असे अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शैनेश्वर देवस्थान मध्ये बनावट ॲप तयार करून भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या […]








