अहिल्यानगर – शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथील बनावट ॲप प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिराने अटक केली. सचिन अशोक शेटे व संजय तुळशीराम पवार , असे अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
शैनेश्वर देवस्थान मध्ये बनावट ॲप तयार करून भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या प्रकरणांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांची नावे समोर आली असून ,यातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वतः याबाबत फिर्याद दिली. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. सायबर पोलिसांनी दोन जणांना अटक केली. आणखी काही कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आहेत.



