सिंधुदुर्ग

कळणेत ओंकारची एंट्री, वन विभागाची डोकेदुखी वाढली

दोडामार्ग : मागील तीन महिन्यांपासून गोवा राज्यात व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास डोंगरपाल गावातून तो कळणे परिसरात दाखल झाला. या अनपेक्षित पुनरागमनामुळे हत्तीबाधित गावातील ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. एकीकडे गणेश टस्कर व दुसरीकडे ओंकार हत्ती दाखल झाल्याने वनविभागाची मात्र डोकेदुखी वाढली […]

रायगड

६ तासांच्या शोधानंतरही बिबट्या न सापडल्याने गदारोळ

अलिबाग- सहा तासांहून अधिक काळ लोटूनही बिबट्या वन विभागाच्या हाती लागला नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. सुरक्षेच्या कारणास्तव घरातच थांबलेल्या ग्रामस्थांचा संयम सुटू लागला आणि प्रशासनाविरोधात गदारोळ सुरू झाला. “बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा”, “नागरिकांच्या जीवाला धोका आहे” अशा घोषणा देत नागरिकांनी शोध मोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच वाहतूक पोलीस […]

रत्नागिरी

आचारसंहितेचा भंग; अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान फेसबुकवर पोस्ट करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार योगेश हळदवणेकर यांच्यावर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेसेनेचे उमेदवार निमेश नायर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २ मधील अपक्ष उमेदवार याेगेश हळदवणेकर व शिंदेसेनेचे निमेश नायर हे २ डिसेंबर रोजी […]

मुंबई शहर

“२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत…”; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार

मुंबई – धारावी पुनर्वसन प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा शहरी विकास प्रकल्प आहे. मागील ४० वर्षापासून धारावीचा विकास करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु काम पुढे सरकत नव्हते. परंतु आता सरकारने आंतरराष्ट्रीय निविदा काढली आणि त्यात अदानी ग्रुपची निवड झाली. धारावी प्रकल्पात जवळपास २ लाख घरे बनवण्यात येणार आहे अशी माहिती अदानी ग्रुपचे प्रणव अदानी यांनी दिली आहे. एका मुलाखतीत धारावी […]

मुंबई उपनगर

फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी

मुंबई/उरण : उरण-नेरूळ आणि बेलापूर मार्गावरील लोकल सेवांचा विस्तार लवकरच होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. नेरूळ-उरण-नेरूळ ४  आणि बेलापूर-उरण-बेलापूर ६  अशा एकूण १० अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.  तरघर आणि गव्हाण ही नवी स्टेशन मंजूर झाल्याचेही सांगितले. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू […]

पालघर

बनावट सह्यांच्या मदतीने ११२ कोटी रु. हडपण्याचा डाव

जव्हार/मोखाडा : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठेकेदारांची जमा असलेला १११ कोटी ६३ लाखांचा निधी हा खोटा धनादेश आणि बनावट सह्यांच्या मदतीने हडपण्याचा डाव एसबीआय शाखा जव्हारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे उधळला आहे. शुक्रवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी जव्हार पोलिसांत तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक तथा विक्रमगडचे विद्यमान नगराध्यक्ष नीलेश ऊर्फ […]

ठाणे

अनधिकृत बांधकाम प्रकरणात खंडणी उकळणाऱ्यांनी उच्छाद

मीरारोड- अनधिकृत बांधकामांच्या राजकीय आणि प्रशासकीय साटेलोट्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणात खंडणी उकळणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. भाईंदरच्या एका सरकारी जागेत होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करून खंडणी उकळणाऱ्या व आणखी खंडणीची मागणी करून कारवाईची धमकी देऊन घर बांधणाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चौघांवर भाईंदर पोलिसांनी खंडणी, मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पश्चिमेस शास्त्री नगर ही सरकारी जागेतील अनधिकृत […]