परभणी

पोलिसांनी सिनेस्टाइल पकडला आरोपी; रुग्णालयातून नेताना हातकडीसह पळाला

सेलू (जि.परभणी) : सेलू पोलिसांनी सराईत गुन्हेगार सोमवारी सेलू शहरात सिनेस्टाइल पकडला. त्यानंतर तो स्थागुशा पथकाच्या स्वाधीन केला. मुद्देमाल रिकव्हरीनंतर तो सेलू पोलिसांनी एका गुन्ह्यात ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी दरम्यान बुधवारी रात्री हा आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन हातकडीसह पळून गेल्याचा प्रकार पुढे आला. यानंतर पोलिसांची शोधमोहीम सुरू असली तरी तो गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडला नाही.

ज्ञानेश्वर शंकर पवार (२६, रा. सेलू) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. सेलू पोलिस व स्थागुशा पथकास हवा असलेला सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर पवार यास सोमवारी सेलू पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करीत पकडला. यावेळी पोलिस व आरोपीलाही दुखापत झाली. पुढे हा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला. बोरी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात आरोपीकडून मुद्देमाल रिव्हर झाला. या आरोपीची परभणी कारागृहात रवानगी झाली, बुधवारी रात्री कायदेशीररीत्या त्यास सेलू येथील दाखल गुन्ह्यात ताब्यात घेतले.

दरम्यान, रात्री ९ वाजेच्या सुमारस सेलू उपजिल्हा रुग्णालयात आरोपीची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर बाहेर येताच पोलिस वाहनात बसताना पोलिसांचे लक्ष चुकवत त्याने जोराचा झटका देत हातकडीसह अंधारात कापूस तूर असलेल्या शेतात पळून गेल्याचा प्रकार समोर आला. या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी सिनेस्टाइल पकडून बेड्या घातल्या. नंतर तो आमच्याच पोलिस कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन पळाला, त्याला शोधण्यासाठी तीन पथके कार्यरत आहेत. त्याला आम्ही पकडून आणू, असे पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी सांगितले. तो पळून गेल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सेलू ठाण्यात गुन्हा नोंद केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *