गत आठवड्यापासून पुन्हा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. गुरुवारी यंदाच्या वर्षातील ६ अं. से. तापमानाची नोंद येथील हवामान केंद्रावर झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान केंद्राने मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना थंडीचा यलो अलर्ट दिला आहे.
गत आठवड्याच्या शेवटीपासून पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या थंड गारठ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान, थंडीची आणखी तीव्रता वाढले, असा अंदाज भारतीय हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. त्यापासून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे. किमान तापमानात घट झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.
५ डिसेंबर रोजी किमान १५.०, तर कमाल २९.० अं. से. असे तापमान नोंदले गेले होते. त्यात सातत्याने घट होत असून गुरुवार, ११ डिसेंबर रोजी किमान तापमान ६.०, तर कमाल तापमान ३०.० अं. से. असे राहिले आहे.


