हिंगोली

वायदेबाजारातून हळदीच्या व्यापारात २५ हजार कोटींचा गैरव्यवहार

हिंगोली : मागील दहा वर्षांमध्ये वायदेबाजारातून हळदीच्या व्यापारात २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी तसेच वायदेबाजारातून हळदीला वगळावे, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस उत्पादक पिचला गेला असताना आता पिवळं सोनं म्हणून ओळखला जाणारा हळद उत्पादक […]

लातूर

भारतीय हवामान केंद्राकरून मराठवाड्याला थंडीचा यल्लो अलर्ट!

गत आठवड्यापासून पुन्हा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. गुरुवारी यंदाच्या वर्षातील ६ अं. से. तापमानाची नोंद येथील हवामान केंद्रावर झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान केंद्राने मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना थंडीचा यलो अलर्ट दिला आहे. गत आठवड्याच्या शेवटीपासून पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या थंड गारठ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान, थंडीची […]

परभणी

पोलिसांनी सिनेस्टाइल पकडला आरोपी; रुग्णालयातून नेताना हातकडीसह पळाला

सेलू (जि.परभणी) : सेलू पोलिसांनी सराईत गुन्हेगार सोमवारी सेलू शहरात सिनेस्टाइल पकडला. त्यानंतर तो स्थागुशा पथकाच्या स्वाधीन केला. मुद्देमाल रिकव्हरीनंतर तो सेलू पोलिसांनी एका गुन्ह्यात ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी दरम्यान बुधवारी रात्री हा आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन हातकडीसह पळून गेल्याचा प्रकार पुढे आला. यानंतर पोलिसांची शोधमोहीम सुरू असली तरी तो गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडला नाही. ज्ञानेश्वर […]

जालना

शेतातील रस्त्याचा वाद, नायब तहसीलदारांच्या टेबलावर शेतकऱ्याने पैसे फेकले

बदनापूर (जि. जालना) : तालुक्यातील हलदोला येथील दोन शेतकऱ्यांमध्ये शेतात जाण्याचा रस्त्याचा वाद असून याबाबत नायब तहसीलदारांनी पैसे मागितल्याचा आरोप करत शेतकऱ्याच्या मुलाने नायब तहसीलदारांच्या टेबलवर पैसे आणून टाकले. परंतु, नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी याबाबतचा आरोप फेटाळत पैशाची मागणी केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तालुक्यातील हलदोला येथील श्रीहरी जनार्दन मात्रे यांनी हलदोला शिवारातील गट […]

नांदेड

राज्यातील ५० ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांवर माहितीपट, मराठवाड्यातील १३ पुरातन मंदिरांचा समावेश

नांदेड : महाराष्ट्राला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि अद्वितीय स्थापत्यशैलीमुळे महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या राज्यातील ५० तीर्थक्षेत्रांवर माहितीपटाची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३ डिसेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या माहितीपटाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने ४ कोटी ६२ लाख रुपये इतक्या भरीव रकमेला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन […]

उस्मानाबाद (धाराशिव)

तक्रार मागे घेण्यासाठी तहसीलदारास ब्लॅकमेल; मंडळ अधिकाऱ्यावर तुळजापुरात गुन्हा

धाराशिव : तुळजापुरातील तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यात पेटलेला वाद थेट आता खंडणीपर्यंत येऊन पोहोचला आहे. मंडळ अधिकाऱ्यानेे तहसीलदारांनी शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद करताच तहसीलदारांनीही मंडळ अधिकाऱ्याने खंडणी मागितल्याची तक्रार दिली. यावरून दोघांविरुद्धही गुन्हे दाखल झाल्याने महसूल विभागातील नवा वाद चव्हाट्यावर आला. तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. येथील मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

मोठ्या विमानांसाठी छत्रपती संभाजीनगर होणार सज्ज, विस्तारीकरणाला वेग

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३९ एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादनासाठी ८७.८२ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास मंगळवारी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. विमानतळाच्या विस्तारीकरणात प्रामुख्याने धावपट्टीची लांबी वाढणार आहे. यातून मोठ्या विमानांच्या उड्डाणांसाठी विमानतळ सज्ज होईल. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चिकलठाणा, […]