वाशिम

समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक

वाशिममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे समृद्धी महामार्गावर चालत्या कंटेनर मधून तब्बल २ कोटी ४३ लाखांच्या वॅक्सीनची रॉबरी केल्याची घटना समोर आली. ही चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिमपोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरी गेलेल्या वॅक्सीनचा मात्र अजूनही शोध घेतला जात आहे. या गुंन्ह्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली […]

वर्धा

राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने….

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे मतदान २ डिसेंबरला पार पडले. अनेक ठिकाणी वादावादी, मारामारी, बोगस मतदान झाले आहे. मतदानावेळी तणाव असतानाच एक बातमी येऊन ठेपली, ती म्हणजे या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला नाही तर २१ डिसेंबरला लावणार याची. यावरून राज्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. यामागे नेमके काय घडले, कोणी उच्च न्यायालयात याचिका […]

यवतमाळ

पोलिस पाटलांना किमान ४० हजार रुपये मानधन द्या

यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात पोलिस पाटलांची ४० हजार पदे आहेत. यापैकी ८ हजार पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांचा पदभार कार्यरत पोलिस पाटलांवर सोपविण्यात आला आहे. यामुळे एका पोलिस पाटलाला दोन ते तीन गावांची जबाबदारी आली आहे. असे असले तरी पोलिस पाटलांना निर्धारित मानधन वेळेवर मिळत नाही. शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकांसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च, वही, कागद […]

भंडारा

दोघांचे लग्न अशक्य, प्रेयसीचे जुळल्याने तो तिला भेटायला गेला अन दोघांनीही विष घेऊन घात केला

भंडारा : मोहाडी तालुक्यातील जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या घोरपड येथील तरुण आणि दुधाळा (ता. मौदा, जि. नागपूर) येथील तरूणीने प्रेमात अडसर निर्माण झाल्याने विष घेतले. यात तरूणाचा मृत्यू झाला तर, तरूणीही गंभीर आहे. पुनीत नरेश भालावीर (२५) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ रात्री वाजता उघडकीस आली. १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुनीत […]

बुलढाणा

आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले

बुलढाणा नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी आज, २ डिसेंबर २०२५ रोजी सुरू असलेल्या मतदानादरम्यान बोगस मतदानाचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळा आणि आयटीआय मतदान केंद्रांवर मयत झालेल्या तसेच बाहेरगावी गेलेल्या मतदारांच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला बोगस मतदान करताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले होते. त्याला […]

नागपूर

’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

नागपूर – नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन नाकारला जात आहे. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून, बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते यांनी […]

चंद्रपूर

गोसेखुर्दची दुरुस्ती सुरू होण्यास १४ वर्षे, शेतकऱ्यांमध्ये संताप; पाणी केव्हा मिळणार?

नागभीड (चंद्रपूर):गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याला २००९-१० मधील अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले. मात्र, या कालव्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले ते तब्बल १४ वर्षांनी, २०२४ मध्ये. अतिवृष्टीत कि.मी. २१, ३१, ३२, ३४, ३९ आणि ४३ या ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण व खोदकाम कमकुवत झाले; पण या मोठ्या नुकसानीकडे पाटबंधारे विभागाने १४ वर्षे दुर्लक्ष केले. पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील […]

गोंदिया

गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा

मुंबई – राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले. मात्र हायकोर्टाच्या आदेशामुळे ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ईव्हीएममध्ये उमेदवारांचे भवितव्य कैद झाले आहे. ज्याठिकाणी मतदान झाले त्याठिकाणी स्टाँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आले आहे. मात्र यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गोंदियाच्या सालेकसा येथे ईव्हीएमचं सील तोडल्याच्या आरोपावरून राडा झाला […]

गडचिरोली

आरमाेरी तालुक्यात वाघ मृतावस्थेत आढळला; वडसा वन विभागात वन्यप्राणी मृत्यूचे सत्र सुरूच

गडचिराेली : आरमोरी वनपरिक्षेत्रातील विहीरगाव नियत क्षेत्रात साेमवार, ८ डिसेंबर राेजी एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वडसा वन विभागात वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहेत. वाघाचा मृतदेह अत्यंत विकृत अवस्थेत असल्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. विहीरगाव नियत क्षेत्रात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. तेव्हा वडसाचे उपवनसंरक्षक वरुण […]

अमरावती

१८०० बिबटे ठेवण्यासाठी जंगलात रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार

अमरावती : राज्यात सध्या २९ जिल्ह्यांमध्ये बिबट्याने उच्छाद मांडला असून त्याच्या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. बिबटे व मानव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाला ५६० कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात १८०० बिबटे ठेवण्यासाठी जंगलात रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत. बिबटे व मानव संघर्ष आता नैसर्गिक आपत्ती ठरणार. महाराष्ट्रात […]