वैंदाने येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सौर प्रकल्पाचे लोकार्पण
नंदुरबार | ७ नोव्हेंबर
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत वैंदाने येथे उभारण्यात आलेल्या 5 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे लोकार्पण मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाच्या सुरूवातीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसाही कृषी पंपाकरिता अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे.
सौर उर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थिर आणि पर्यावरणपूरक वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला हा प्रकल्प जिल्ह्यातील शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.
कार्यक्रमाला महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. एस. एस. दराडे, कार्यकारी अभियंता श्री. गायधनी (नंदुरबार विभाग) आणि उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य) श्री. आर. डी. चौधरी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या रचना, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली.
या प्रसंगी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळाल्याने सिंचनासाठी सुलभता वाढेल आणि उत्पादनक्षमतेत वाढ होईल. सौर ऊर्जेचा वापर ही पर्यावरणपूरक आणि भविष्यासाठी टिकाऊ दिशा आहे.’
सदर सौर प्रकल्पामुळे परिसरातील कृषी उत्पादनक्षमता वाढेल, ऊर्जा बचत होईल आणि जिल्हा हरित ऊर्जेकडे वाटचाल करेल.
.
.
.
#SolarEnergy #CMKusumYojana #RenewableEnergy #Nandurbar #DrMitaliSethi #Mahavitaran #SustainableDevelopment #GreenNandurbar #SolarPower #AgricultureEnergy








