जुने लेख

रांझणी येथे कार्तिकीनिमित्त भक्तीचा जागर

 रांझणी येथे कार्तिकीनिमित्त भक्तीचा जागर 

 तळोदा तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या रांझणी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. दि. 2 नोव्हेंबर रोजी पहाटे काकडा आरती तसेच सकाळी आठ वाजता महापूजा श्री समाधान भिवसन लोखंडे व सौ निर्मला समाधान लोखंडे, सारथी फाउंडेशन तळोदा यांच्याहस्ते करण्यात आली. तसेच श्रीहरीची पालखी मिरवणूक  काढण्यात येऊन ह भ प आत्माराम भजनी मंडळ रांझणी यांची साथ लाभली. सायंकाळची आरती योगेशभाऊ मराठे व अशोकभाऊ कासार नवसारी यांच्या लहस्ते करण्यात आली.

       दिवसभरातून राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विठुरायाचे दर्शन घेतले.  अवकाळी पावसापासून उघडीप दे आणि रब्बीचा हंगाम जोरदार जाऊ दे अशी विठुराया चरणी सर्व भाविकांनी साकडे घातले.

          विठ्ठल रुक्माई मंदिरात हरिनाम कीर्तन सप्ताह व  श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळाचे शंभरावे वर्ष सुरू कथेचे यजमान प्रल्हाद भारती, सौ सीमाबाई भारती असून कथेचे निरूपण ह भ प भागवताचार्य कविताताई सावळे करीत आहेत.दिनांक 3 नोव्हेंबर सोमवार रोजी ह भ प कविताबाई सावळे यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तरी सर्व भक्तांनी महाप्रसाद लाभ घ्यावा तसे आवाहन विठ्ठल रुक्माई सेवा समिती,सर्व ग्रामस्थ मंडळी,नवयुवक मंडळी रांझणी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *