जुने लेख

देव, देश, धर्मासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा= ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शताब्दी वर्षानिमित्त कीर्तनात

 देव, देश, धर्मासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा= ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर 

अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शताब्दी वर्षानिमित्त कीर्तनात

   देव,देश, धर्मासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ह. भ .प.समाधान महाराज भोजेकर यांनी केले. ते रांझणी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञसोहळा शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते. त्यांनी सांगितले की देव हा सर्वव्यापी आहे.आपण काहीच न मागता तो आपल्याला देतो. फक्त चांगले कर्म करावे. तो फळ नक्कीच देतो. संप्रदायाचा प्रचार प्रसार करावा.धर्मकार्य आणि परमार्थात केलेले  योगदान कधीच वाया जात नाही असे सांगत आजच्या तरुणांनी देव, देश, धर्मासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

    ह.भ. प.समाधान महाराज भोजेकर यांनी आपल्या विनोदी शैलीत बोलताना बेटी बचाव बेटी पढाव, व्यसनमुक्ती, मोबाईलचा अतिरेक याविषयी विविध उदाहरणे  पटवून दिले. तसेच तरुणीनी आपल्या  आपल्या आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी, आपल्यासाठी किती मेहनत घेतली आहे जाण ठेवावी, कोणाच्याही मोहाला आमिषाला  बळी पडू नये,आपल्या आईवडिलांना मान खाली घालायला लावू नये अशी कळकळीची विनंती केली.    कीर्तनासाठी मोठ्या संख्येने रांझणी,प्रतापपुर, चिनोदासह  तालुक्यातून भाविक दाखल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *