जुने लेख

भारतीय जनता पार्टी तळोदा तालुका महामंत्री (सरचिटणीस)पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची नियुक्ती.

 भारतीय जनता पार्टी तळोदा तालुका महामंत्री (सरचिटणीस)पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची नियुक्ती.

  तळोदा तालुका भाजपा  महामंत्री (सरचिटणीस) पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची निवड करण्यात आली. निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

                      भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व आमदार  राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांच्या सूचनेनुसार तळोदा तालुकाध्यक्ष दरबारसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये भाजपा तळोदा तालुका महामंत्री (सरचिटणीस) पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची  नियुक्ती करण्यात आली.

               आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष संघटन हे आपले कर्तव्य समजुन संघटनात्मक दृष्टीने ते अजुन जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहोचून कसे मजबुत व बळकट करता येईल या साठी कार्य करीत राहील आणि पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी मी निश्चितच उत्तम रित्या पार पाडले असा विश्वास शुभम चौधरी यांनी व्यक्त केला. 

        इंजि.शुभम चौधरी यांनी या अगोदर भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ,भाजपा तालुका सचिव अश्या अनेक पदांवर काम केले आहे. ते धानोरा येथील प्रगतशील शेतकरी व  उद्योजक तसेच तळोदा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक आणि भाजपा चे जुने खंदे समर्थक   संजय चौधरी यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या नियुक्ति बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *