जुने लेख

नेमसुशिल संकुलात वंदे मातरम गीत गायन.

 नेमसुशिल संकुलात वंदे मातरम गीत गायन.

      तळोदा, :-  वंदे मातरम या गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात “वंदे मातरम” या गीताचा सामूहिक गायनाचा कार्यक्रम पार पडला. येथील संत गुलाम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या तर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दिपक धिवरे होते. प्रमुख वक्ते अँड. प्रितम निकम होते. प्रमुख पाहुणे म्हणून  आमदार राजेश पाडवी, गटविकास अधिकारी राजू किरवे, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, पोलीस निरीक्षक राजन मोरे, नेमसुशिल शैक्षणिक समूहाचे संस्थाध्यक्ष निखिलकुमार तुरखीया, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक जे. बी. पाटील, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे प्रतिनिधी शिवदास कोळी,  प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन, आय.एम.सी. सदस्य योगेश्वर पवार, पत्रकार सदस्य सम्राट महाजन, मुख्याध्यापिका पुष्पा बागुल, प्राचार्य सुनील परदेशी, मुख्याध्यापक मिलिंद धोदरे, प्राचार्य पी. डी. शिंपी, मुख्याध्यापिका भावना डोंगरे, शिरीष मगरे, विजय सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ते अँड. प्रितम निकम यांनी वंदे मातरम या गीताचा भावार्थ व इतिहास सांगितला. स्वातंत्र्य वीरांच्या गाथेला उजाळा दिला. प्रास्ताविक शिल्प निदेशक एम. आर. हुंबे यांनी केले. वंदे मातरम् गीताला श्रीमती कल्याणी वडाळकर, सचिन पाटील यांनी संगीतबद्ध केले. नेमसुशिल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम नाटिका सादर केली. नाटिकेसाठी रवींद्र गुरव व रेखा मोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला संत गुलाम महाराज शासकीय औ. प्र. संस्था तळोदा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिर्वे तसेच नेमसुशिल प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मीडियम स्कूल तसेच न्यू हायस्कूल, शेठ के. डी. हायस्कूल, श्रीमोती विद्यामंदिर, कन्या विद्यालय आदी शाळांचे विद्यार्थी शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व गावातील विविध मान्यवर उपस्थित होते.

अरुण कुवर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रकल्प अधिकारी जे. बी. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अ. श. शाह, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक जे. बी. पाटील व सर्व शिल्प निदेशक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *