जुने लेख

तळोदा समाजकार्य महाविद्यालय प्रा. निलेश गायकवाड यांना विद्यावाचस्पती आचार्य (पी.एचडी) पदवी प्रदान

 तळोदा समाजकार्य महाविद्यालय प्रा. निलेश गायकवाड यांना विद्यावाचस्पती आचार्य (पी.एचडी) पदवी प्रदान

       तळोदा येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक निलेश उत्तम गायकवाड यांनी “नंदुरबार जिल्हयातील शासकीय आश्रम शाळेत माध्यामिक शिक्षण घेणाऱ्या भिल आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा व समस्यांचे अध्ययन या विषयातील विद्यावाचस्पती आचार्य (पी.एचडी ) ही पदवी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथुन कुलगुरू प्रा.डॉ. माहेश्वरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

         प्रा.निलेश गायकवाड यांनी आजपर्यंत २५ आंतराष्ट्रिय, राष्ट्रिय स्तरावरील विविध सामाजिक ज्वलंत प्रश्नावरील शोध निबंध प्रकाशित केले असून समाजकार्य विष‌यातील ४ पुस्तकांचे लिखाण केले आहे. तसेच आजपर्यंत ५० पेक्षा अधिक विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थामध्ये समाजातिल ज्वलंत समस्या व उपायोजना यावर व्याख्याने दिलेली आहे. महाविद्यालयात त्यांनी IQAC समन्वयक म्हणून काम पाहिले.

महाविद्यालयातील संशोधन आणि विस्तार विभाग समन्वयक म्हणून २० पेक्षा अधिक आंतराष्ट्रिय, राष्ट्रीय , NGO’s, CSR सेक्टर व शासकीय विभागांचे मूल्यमापन प्रकल्प, सर्व्हे पी.आर.ए  प्रशिक्षण, गरजेवर आधारित नियोजन आणि प्रकल्पाची अमंलबजावणी करून त्यामध्ये विद्यार्थ्यांना संधी देऊन त्यांचा शैक्षणिक व सराव विकासासाठी सातत्यपूर्ण कार्य करत आहे.

       विद्यापीठाच्या विविध प्रमुख समिती वर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. समान संधी विकास केंद्राचे समन्वयक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांना विविध सामाजिक व CSR सेक्टर मध्ये प्लेसमेंट मिळवून देण्यासाठी कार्यशील आहेत. ते एक उत्तम विद्यार्थी प्रिय शिक्षक, प्रशासकीय कार्य व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी  विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देतात. आजपर्यंत भारत सरकार तर्फे त्यांच्या दोन पेटंटची नोंद आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन आजपर्यंत त्यांना आंतराष्ट्रिय व राष्ट्रिय स्थरा वरील एकूण ०९ पारितोषिके व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.

प्रा . निलेश गायकवाड यांना या पदवी साठी प्रा.डॉ.फारुख शेख यांनी मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. त्याच्या या यशासाठी प्राचार्य उषा वसावे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणी कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी, उपाध्यक्ष रोहीत माळी, कोषाध्यक्ष लक्ष्मण आप्पासाहेब माळी, सर्व व्यवस्थापन सदस्य यांनी कौतुक व अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *