तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा पुनर्वसन,प्रतापपूर, चिनोदा, मोहिदे, तळवे, मोड, बोरद परिसरात गहू पेरणी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र असून सध्या तालुक्यात चांगलाच गारठा असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांकडून पेरणीस वेग देण्यात येत आहे.दरम्यान शेतकरींकडून कापूस वेचणी, खोडवा ऊसाची तोड करण्यात येऊन लगेच शेतीची मशागत करण्यात येत असून ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी यंत्राद्वारे गहू पेरणी करण्यात येत आहे. पेरणी […]

