नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज – विकास आणि तत्परता यांचा समन्वय
नंदुरबार जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (सा.बां.) सातत्याने कार्यरत आहे. कार्यकारी अभियंता श्री. अंकुश अ. पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे व आपत्कालीन उपाययोजना गतीने पूर्ण होत आहेत.
आपत्कालीन कामे व तत्परता:
1. तळोदा तालुक्यातील चांदसैली घाटात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन, उपविभाग क्र. २ व शाखा अभियंता यांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले.
2. त्यानुसार श्री. नितीन वसावे, उपअभियंता व श्री. सुधाकर चौरे, शाखा अभियंता यांनी दोन तासांत दरड व मलबा हटवून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.
3. विभागाने आपत्कालीन परिस्थितीसाठी २४x७ सज्ज यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
विकासकामे व पाहणी:
⦁ ADB-EPC-३९ अंतर्गत सावळदे–रनाळा–शनिमांडळ–छडवेल रस्ता (रा.मा.-७) याची पाहणी करून गुणवत्ता व सुरक्षा उपाययोजनांबाबत ठेकेदारास सक्त सूचना.
⦁ जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत – Water Proofing कामांची पाहणी करून गुणवत्ता व गतीने पूर्ण करण्याचे आदेश.
⦁ नटावद ग्रामीण रुग्णालयीन इमारत व निवासस्थान – कामे पूर्ण.
⦁ मॉडेल डिग्री कॉलेज व वसतीगृह इमारत – कामे पूर्ण.
⦁ तळोदा तालुक्यातील विविध विकासकामांना प्रत्यक्ष भेट देऊन ठेकेदार व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना.
आढावा व प्रगती:
1. सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार येथे सर्व उपविभागांची आढावा बैठक आयोजित.
2. मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, नाशिक यांच्या आढाव्यात नंदुरबार विभाग अग्रेसर ठरल्याचे स्पष्ट झाले.
नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाने विकासकामांमध्ये गती, गुणवत्ता आणि आपत्कालीन तयारी यांचा आदर्श समन्वय साधला आहे. रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सोयींच्या प्रकल्पांद्वारे जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान होत आहे.
.
.
.
#नंदुरबार #सार्वजनिकबांधकाम #विकासकामे #पायाभूतसोयी #DevelopmentWorks










