रोझवा सजेचे तलाठी जयवंत पाडवी प्रदिर्घ सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार करून निरोप
महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांतर्फे निरोप
![]() |
| निरोप समारंभ – जयवंत पाडवी यांच्या सत्कार तहसीलदार दिपक धिवरे यांच्या हस्ते सत्कार करतांना |
तळोदा तालुक्यातील रोझवे सजाचे तलाठी प्रदीर्ग सेवा देत जयवंत पाडवी हे निवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. तलाठी जयवंत पाडवी व त्यांच्या सुविद्य पत्नी मिनाबाई जयवंत पाडवी यांच्या निरोप निमित्त तहसीलदार दिपक धिवरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.
याप्रसंगी महसूल नायब तहसीलदार विजय ससे, निवासी नायब तहसीलदार निशा नाईक व महसूल कर्मचारी उपस्थित होते. रोखवे सजेचे तलाठी जयवंत पाडवी हे आपल्या 33 वर्ष 7 महिने च्या प्रदिर्घ सेवेतून निवृत्त झाले.
त्यांनी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथून सेवेत सुरुवात केली, सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत केवडिया कॉलनी , मोलगी, खुंटामोडी, खटवानी, सुरावानी, खापर डाब कोठार दुर्गम भागात सेवा दिली.आता कोठार सजेत दि. 31 जुलै रोजी नियन वयोमानाने निवृत्त झाले आहे.








