जुने लेख

तळोदा येथील वैधमापन कार्यालय बंद अवस्थेत ; घरभाडे व घरपट्टी ही थकवली

 तळोदा येथील वैधमापन कार्यालय बंद अवस्थेत ; घरभाडे व घरपट्टी ही थकवली

                तळोदा येथील वैधमापन शास्त्र कार्यालय बंद पडले आहे. घाऊक व ठोक विक्रेत्यांकडून ग्राहकांना वस्तू करतांना ती कमी वजनाची देऊन ग्राहकांची फसवणूक झाल्यास तसेच विक्रेत्यांना वजन मापांचे मूल्यांकन करणे किंवा नूतनीकरण करण्याचे काम वैधमापन शास्त्र कार्यालयामार्फत केली जात असतात. मात्र तळोदा येथील निरीक्षक यांचे वैधमापन कार्यालय मागील सात ते आठ वर्षांपासून बंद अवस्थेत धुळखात पडून असल्याचे दिसून येत आहे.

                     याविषयी सविस्तर वृंत असे की, तळोदा येथील रहिवासी विजयकुमार राणूलाल जैन सर्व्हे नं.३३७/२ यांच्या मालकीच्या जागेवर तळोदा येथील वैधमापन शास्त्र निरीक्षक यांचे कार्यालय असून हे कार्यालय मागील सात ते आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असून सदर कार्यालयाचे जागेचे घरभाडे हे सन २०१७ पासून तर घरपट्टी ही सन २००९ पासून थकवलेली असून याबाबत सदर जागेचे मालक विजयकुमार जैन यांनी वारंवार सहनियंत्रक वैधमापन शास्त्र कार्यालय नाशिक, उप नियंत्रक वैधमापन कार्यालय धुळे, निरीक्षक वैधमापन शास्त्र कार्यालय तळोदा यांना वारंवार पत्र व्यवहार करून देखील सदर कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसून पाच ते सहा वेळा सदर घरमालक धुळे येथील उप नियंत्रक वैधमापन कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन सुध्दा कुठलाच प्रतिसाद देत नसून या वैधमापन शास्त्र कार्यालयाने घरभाडे व घरपट्टी थकवली असून सदर निरीक्षक वैधमापन कार्यालय हे फक्त नावालाच सुरू आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *