जुने लेख

नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां

नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां

             तळोदा येथील नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 

       थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक व थोर समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

विद्यार्थ्यांनी आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःचा परिचय करून देत आपली ध्येय व स्वप्न ही स्पर्धेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. केजी सेक्शन आणि इयत्ता पहिली व दुसरी सेल्फ इंट्रोडक्शन इयत्ता तिसरी व चौथी शो अँड टेल इयत्ता पाचवी ते सातवी स्पेलिंग कॉम्पिटिशन इयत्ता आठवी ते दहावी पॅसेज ट्रान्सलेशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला तज्ञपरीक्षक म्हणून प्राथमिक विभागाच्या सहशिक्षिका योगिता सोनवणे, इंग्लिश मीडियम च्या सहशिक्षिका गीतांजली पाटील, प्रतिभा बैसाणे, भावना शिंपी या लाभल्या व क्रमशा प्रथम व द्वितीय नंबर देखील काढण्यात आले स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष निखिल तूरखीया,  उपाध्यक्ष डी एम महाले, संचालिका सोनाबेन तूरखीया, सचिव संजय पटेल, संस्था समन्वय हर्षिल तूरखीया यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक पी.डी शिंपी, उपमुख्याध्यापिका कल्याणी वडाळकर, केजी सेक्शन मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. दिपाली पाटील, वर्षा मराठे, योगिता शिंदे, अक्षता बारी, बादल वळवी, मनीषा साबळे, सुमित्रा तांबोळी, धरती पाटील, राजश्री चव्हाण, ज्योती पाडवी, संगीता पाटील, माधुरी पाटील, काजल पाटील, काजल पाटील, ललिता पाडवी, दीपा पाडवी, ईश्वरचित्रकथे, नंदिनी पाडवी, प्रियंका गोसावी इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले सोनाली बांदकर व अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *