तळोदा शहरातील नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांना विविध स्पर्धेच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रथम व द्वितीय क्रमप्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली. परीक्षक म्हणून अरुण कुवर श्रीमती तांबोळी यांनी काम पाहिले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संदिप चौधरी, देवेंद्र शिंपी, कमलेश पाटील सागर मराठे, सचिन पाटील, सुदाम मुजगे रुख्मिणी खर्डे, अश्विनी भोपे, योगिता सोनवणे, राजेश मराठे, अंकित डोंगरे, शैलेंद्र पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन चंद्रकांत भोई यांनी तर आभार प्रतिभा गुरव यांनी मानले






