जुने लेख

दिव्यांग बांधवांना शारीरिक,मानसिक दृष्ट्या आधार द्यावा; -आ.चंद्रकांत रघुवंशी ५४ लाभार्थ्यांना ८४ सहाय्यक उपकरणांचे वाटप

 दिव्यांग बांधवांना शारीरिक,मानसिक दृष्ट्या आधार द्यावा;                                                              -आ.चंद्रकांत रघुवंशी

५४ लाभार्थ्यांना ८४ सहाय्यक उपकरणांचे वाटप

           नंदुरबार (प्रतिनिधी)- समाजातील प्रत्येक घटकाने दिव्यांग बांधवांसाठी योगदान देऊन त्यांच्या सन्मान करावा. त्यांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या आधार द्यावा असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

                  आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ व अलिमको यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये रविवारी दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे वाटप आ.रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेती संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी नगरसेवक रवींद्र पवार,परवेज खान,दीपक दिघे,चेतन वळवी,अलिमकोचे अधिकारी किरण पावरा त्याचप्रमाणे छत्रपती मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते. 

जानेवारी महिन्यात आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ व अलिमको यांच्या संयुक्त दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली होती.त्यातील पात्र लाभार्थ्यांना रविवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले.८ इलेक्ट्रिकल बॅटरी सायकल व २० चेन सायकल,श्रवण यंत्र व इतर उपकरण वाटप झाले. यावेळी दिव्यांगांसोबत त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *