जुने लेख

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवरील हल्ल्याचा अक्कलकुवा वकील संघाचा तीव्र निषेध

 भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवरील हल्ल्याचा अक्कलकुवा वकील संघाचा तीव्र निषेध

      अक्कलकुवा (प्रतिनिधी) – भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश आदरणीय श्री. भूषण गवई साहेब यांच्यावर दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याचा अक्कलकुवा वकील संघाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आरोपी अ‍ॅड. राकेश किशोर यादव याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघाच्या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.

              दिनांक ७ ऑक्टोबर रोजी अक्कलकुवा वकील संघाची सर्वसाधारण बैठक संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. संग्राम पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा तीव्र निषेध करत, सर्वोच्च न्यायालय हे भारतीय लोकशाहीचे आणि न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च प्रतीक असल्याचे नमूद करण्यात आले. अशा पवित्र स्थळी हल्ला होणे म्हणजे न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारे व देशाच्या संविधानिक मूल्यांवर आघात करणारे कृत्य असल्याचे सर्व सदस्यांचे मत नोंदविण्यात आले.

      महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने या घटनेचा निषेध नोंदवून आरोपी अ‍ॅड. राकेश किशोर यादव याच्यावर कठोर कारवाई करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्या ठरावाला अक्कलकुवा वकील संघाने एकमुखाने पाठिंबा दर्शवला आहे.

                         बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांनी न्यायव्यवस्थेचा सन्मान अबाधित राखण्याचा आणि भविष्यात अशा घटनांविरुद्ध एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकीस  सचिव अ‍ॅड. रुपसिंग वसावे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.एम. व्ही. कलाल,अ‍ॅड. आर. आर. मराठे,अ‍ॅड.एस. व्ही. वाणी,अ‍ॅड. आर. टी. वसावे, अ‍ॅड. जे. टी. तडवी,अ‍ॅड. एच. एन. पाडवी, अ‍ॅड. जितेंद्र वसावे, अ‍ॅड.आर. पी. तडवी,अ‍ॅड. जे. के. राऊत,

तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *