तळोदा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची
पाहणी
दि.29 सप्टेंबर रोजी झालेल्या सततच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील
तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील विविध पिकांवर
पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी
तळोदा तालुक्यातील दसवड गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान उपस्थित अधिकारी व शेतकरी
या भेटीवेळी उपविभागीय अधिकारी श्री.अनय नावंदर (तळोदा विभाग), तहसीलदार
श्री.दीपक धिवरे, तालुका कृषी अधिकारी सौ.मीनाक्षी वळवी, तसेच ग्राम महसूल
अधिकारी, मंडळ अधिकारी बोरद, कृषी सहाय्यक आणि शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी संवाद
डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांचे नुकसान पाहिले व
शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांनी सांगितलेल्या समस्यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी आश्वासन दिले
की, शासनस्तरावर आवश्यक ती मदत व उपाययोजना करण्यात येईल.
नुकसानभरपाईच्या प्रस्तावाची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी
संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी आश्वासन दिले की शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे
उभे आहे.
शासनाचा उद्देश स्पष्ट
या पाहणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शासनाचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक
शेतकऱ्याला वेळेत मदत मिळावी आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई होऊन शेती व्यवसाय
टिकून राहावा.
.
.
.
#नंदुरबार #जिल्हाधिकारीडॉमित्तालीसेठी #तळोदा #शेतकरी #पिकांचे_नुकसान
#शेतकऱ्यांचा_आधार #FarmerSupport #CollectorNandurbar #DrMitaliSethi #CropLoss
#HeavyRain #Taloda #NandurbarAdministration #GoodGovernance #FarmerWelfare








