भाजपा किसान मोर्चा व “ग्रामपंचायत तळवेच्या वतीने सेवा सप्ताहात नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी”
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सुरू असलेल्या सेवा सप्ताहाच्या औचित्याने तळवे ग्रामपंचायत व भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत गावातील शेकडो नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू, चष्मा तपासणी तसेच इतर डोळ्यांच्या आजारांबाबत मार्गदर्शन व आवश्यक औषधोपचार देण्यात आले. गरजू रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेबाबत माहितीही उपलब्ध करून देण्यात आली.
या आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून शहादा–तळोदा मतदारसंघाचे आमदार आरोग्यदूत राजेश पाडवी, महामंत्री बळीराम पाडवी ,किसान मोर्चा प्रदेश सदस्य शाम राजपूत, मोड ग्रामपंचायत सदस्य महेश नवले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार पाडवी यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी असे आवाहन केले.
शिबिराचे आयोजन यशस्वी करण्यासाठी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, सरपंच मोग्या भील, उपसरपंच ताराचंद शिंदे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ ठाकरे , दिपक ठाकरे, भाजपा कार्यकर्ते, तसेच स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या शिबिरामुळे नागरिकांमध्ये “आरोग्यदायी डोळे – आनंदी जीवन” हा संदेश पोहोचला.





