व्यवसाय

तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स

PPF Investment: पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही एक कर वाचवणारी गुंतवणूक योजना (Tax Saving Investment Scheme) आहे. पण कल्पना करा, तुम्ही या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरही जर तुम्हाला टॅक्स भरावा लागला तर काय होईल? तुमच्या एका छोट्या चुकीमुळे तुमच्यासोबत असं होऊ शकतं. चला तर मग, तुमचा पीपीएफ खात्याचा परतावा कधी टॅक्स-फ्री राहत नाही, ते समजून घेऊया.

पीपीएफमधील टॅक्स-फ्री परतावा
पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे, जी सरकारी हमीसह येते. या योजनेत केवळ व्याजाचे पैसेच करमुक्त (Tax-Free) नसतात, तर मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम (गुंतवणुकीची रक्कम + परतावा) देखील करमुक्त असते. निवृत्तीचं नियोजन करणाऱ्यांसाठी ही योजना सर्वाधिक पसंतीची मानली जाते.

TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत

ही चूक पडेल महागात
तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक सुरू करता, पण अनेकदा तुम्ही वर्षभरात किमान रक्कमही जमा करू न शकल्यानं तुमचं खातं निष्क्रिय होतं आणि जर तुमचं पीपीएफ खाते निष्क्रिय झालं, तर त्यावर मिळणारं व्याज टॅक्स फ्री राहत नाही. म्हणजेच, या योजनेत मिळणारा सर्वात मोठा लाभच तुमच्याकडून हिरावला जाऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला परताव्यावर टॅक्स भरावा लागेल.

निष्क्रिय खात्यावर सुविधाही मिळणार नाहीत
पीपीएफ खातं निष्क्रिय होण्याचे अनेक नुकसान आहेत. जसं की, तुम्ही त्यावर मिळणाऱ्या कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही. तसंच, तुम्ही आंशिक पैसे काढण्याची सुविधाही वापरू शकणार नाही. थोडक्यात, एका लहान चुकीमुळे तुम्हाला तुमच्याच पीपीएफ खात्यातून पैसे काढण्यापासून ते अनेक आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

या गोष्टी विसरू नका
तुम्हाला दरवर्षी तुमच्या खात्यात किमान गुंतवणूक करावीच लागते. यासाठी तुम्ही वार्षिक केवळ ₹५०० देखील जमा करू शकता.
ही छोटीशी रक्कम जर योग्य वेळी जमा केली नाही, तरीही तुमचं खातं निष्क्रिय होईल आणि टॅक्स-फ्री व्याजाचा लाभ तुमच्याकडून काढून घेतला जाईल.
तुमच्या एका लहान चुकीमुळे तुमचे पीपीएफ खातं डॉर्मेंट होऊ शकतं.
जर तुमचं खातं दीर्घकाळ निष्क्रिय राहिलं, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. म्हणजेच ₹५० दंड आणि ₹५०० थकबाकी वार्षिक भरावी लागेल.
जर तुम्हाला तुमचं पीपीएफ खाते निष्क्रिय होऊ नये आणि त्यावर मिळणाऱ्या सर्व सुविधा तुम्हाला मिळत राहाव्यात असं वाटत असेल, तर किमान गुंतवणुकीची काळजी घ्यावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *