जुने लेख

सरकारी खरेदी केंद्रे सुरू करा, पिकविमा व ई-पिक पाहणी मुदतवाढ द्या – तळोद्यात भारतीय किसान संघाचे निवेदन

 सरकारी खरेदी केंद्रे सुरू करा, पिकविमा व ई-पिक पाहणी मुदतवाढ द्या – तळोद्यात भारतीय किसान संघाचे निवेदन

तळोदा,  :

भारतीय किसान संघ, तळोदा तालुक्यातर्फे आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सोयाबीन, भात, कडधान्ये, मका व कापूस या शेतमालाची सरकारी खरेदी केंद्रे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांना एम.एस.पी. भावाने खरेदीची हमी द्यावी, एप्रिलपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे व ढगफुटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, गतवर्षीच्या अटींवर पिक विमा योजना पूर्ववत करावी, तसेच ई-पिक पाहणीसाठी मोबाईल ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर करून मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवावी, अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सीसीआयमार्फत हमीभावाने खरेदी लवकर सुरू करून कपास किसान अॅपवर झालेल्या नोंदींचा पुरावा संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलवर पाठवावा, अशीही मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने व्यापाऱ्यांकडून एम.एस.पी.पेक्षा कमी दरात माल खरेदी होण्याची शक्यता असल्याचे नमूद करून केंद्र सरकारची PM ASHA योजना आणि प्राईस स्टॅबिलायझेशन फंड या माध्यमातून तातडीने संरक्षण द्यावे, अशी विनंती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

निवेदनावर बाबूलाल दादा ठाकरे (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), अर्जुन दत्तू पाटील (धानोरा ग्राम समिती अध्यक्ष), नितीन पाटील (चिनोदा ग्राम समिती अध्यक्ष), कीर्ती कुमार माळी (तळोदा ग्राम समिती अध्यक्ष), विजय सोनवणे, मोहन भैय्या रघुवंशी, राजेश चौधरी, शिरीष माळी व सतीश कुंवर यांची सही असून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

हे निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *