जुने लेख

राज्यभर मुख्यमंत्री समृध्दी ग्राम पंचायत राज अभियान आपले गाव, आपला जिल्हा समृध्द करण्यासाठी अभियान तळोदा तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

राज्यभर मुख्यमंत्री समृध्दी ग्राम पंचायत राज अभियान 

आपले गाव, आपला जिल्हा समृध्द करण्यासाठी अभियान 

 तळोदा तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

तळोदा / सप्त नगरी न्युज 

आपले गाव, आपला जिल्हा समृध्द करण्यासाठी राज्यभर मुख्यमंत्री समृध्दी ग्राम पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे. तळोदा तालुकास्तरीय कार्यशाळा येथील प्रशासकीय इमारत सभागृहात पार पडली. 

 मुख्यमंत्री समृध्द ग्राम पंचायत राज अभियान दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान अभियान राबविले जात आहे.  या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायत सहभाग राहणार आहे.

राज्यस्तरीय , विभागस्तरीय, जिल्हा स्तरीय, तालुकास्तरीय पारितोषिक दिले जाणार आहे.

     कार्यशाळेस तहसीलदार दीपक धिवरे, गटविकास अधिकारी आर. डी. कीरवे, सहाय्यक गटविकास अधिकारी के. एम. पवार, विस्तार अधिकारी बी. डी. निकुभे, डी. डी. पाटील, गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर, निती आयोग चे विशाल बेंद्रे, यशदाचे प्रवीण प्रशिक्षक निता पाटील,  प्रशिक्षक मुकेश कापूरे आदीच्या प्रमुख उपस्थित पार पडली.

          आपले गाव, आपला जिल्हा समृध्द करण्यासाठी राज्यभर मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान पार्श्वभूमीवर सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांची कार्यशाळेत प्रवीण प्रशिक्षक सुशासन युक्त गाव (Good Governance),  सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी), जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव यशदाचे प्रशिक्षक निता पाटील यांनी प्रशिक्षण दिले.

         मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, यावर प्रवीण प्रशिक्षक मुकेश कापुरे यांनीप्रशिक्षण दिले.

     तर लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम,

सुशासन युक्त गाव (Good Governance) 5T या विषयावर प्रवीण प्रशिक्षक लिलेश्वर खैरणार यांनी प्रशिक्षण दिले.

स्मार्ट ग्राम वर यशोगाथा तळवे सरपंच मोग्या भील यांनी  मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेत सरपंच राजू प्रधान, डॉ पुंडलिक राजपूत, मोग्या भील,  कांतीलाल पाडवी, दारा वसावे, यांच्या सह सरपंच व ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी राजू किरवे व बी डी निकुंभे यांनी अभियानाची माहिती  दिली. 

कार्यशाळेस उपस्थीत पदाधिकारी व अधिकारी यांचे आभार प्रदर्शन  विस्तार अधिकारी डी डी पाटील  यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *