जुने लेख

जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024-25 : गुणवंत शिक्षकांचा सन्मान

 जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024-25 : गुणवंत शिक्षकांचा सन्मान

                                 नंदुरबार | प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-25 चा वितरण सोहळा उत्साहात पार पडला. 


या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी  नमन गोयल यांच्या मुख्य उपस्थितीत गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

                   या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, जिल्हा शिक्षण  व प्रशिक्षण संस्थेकडून डॉ. राजेंद्र महाजन,

तसेच उपशिक्षणाधिकारी सौ. वंदना वळवी,  निलेश लोहकरे, डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे तसेच सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

सत्कारार्थी शिक्षकांची नावे:

 नंदुरबार तालुका – श्रीम. रंजना गुंड्या साबळे (जि.प. शाळा, नांदर्खे)


नवापूर तालुका –  दिलीप नरशी गावीत (जि.प. शाळा, बोरवण)


 शहादा तालुका – श्रीम. मनिषा सखाराम सोनवणे (जि.प. शाळा, लोहारा)


 तळोदा तालुका – श्रीम. जयवंती गुरा चौधरी (जि.प. शाळा, रोझवा पु. क्र. 4)


 अक्कलकुवा तालुका –  फहिम अख्तर शेख सिकंदर (जि.प. शाळा, मक्राणीफळी – उर्दू)

 धडगांव तालुका –  प्रमोद निंबा बोरसे (जि.प. शाळा, जुने धडगांव)

या शिक्षकांनी आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाचा गौरव या पुरस्कारातून करण्यात आला.

या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना नवे बळ मिळून शिक्षण क्षेत्रात अधिक सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

.

.

.

#nandurbar  #teacherawards  #शिक्षकदिन  #जिल्हाशिक्षकपुरस्कार  #education  #TeachersOfNandurbar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *