जुने लेख

मोदलपाडा नदीकाठी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी पाच-सहा घरांना अति धोका; बिरसा आर्मी व ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

 मोदलपाडा नदीकाठी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी

पाच-सहा घरांना अति धोका;

बिरसा आर्मी व ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

        तळोदा: सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोदलपाडा येथील नदीकाठी असलेल्या पाच ते सहा घरांना नदीपूरचा अति धोका निर्माण झाल्याने त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी तळोदा तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना बिरसा आर्मी व ग्रामस्थांनी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,मुसळधार पावसामुळे मोदलपाड्याहून जाणारा नदीला सतत पूर येत असतात.काल झालेल्या अति मुसळधार पावसामुळे पाच ते सहा घरांना धोका निर्माण झालेला आहे.पावसाळ्यात नदीकाठीचे घरे असलेले ग्रामस्थ भीतीने दिवस काढत असतात.पावसाळ्यात सतत मोठे पूर येत असल्याने त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली आहे. निवेदनावर बिरसा आर्मीचे जिल्हा सचिव सतीश पाडवी,अक्कलकुवा संपर्कप्रमुख दिनेश वसावे,नरेश पाडवी,दिपक पाडवी,गणेश पाडवी,विजेंद्र पाडवी,मगन पाडवी यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *