बीड : नाशिकमधील मालेगाव, बीड तालुक्यातील शिरूरच्या घटना ताज्या असतानाच, आता बीडमध्येही सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाला. या प्रकरणात आरोपीलाही लगेच अटक झाली, परंतु मुलगी असुरक्षित असल्याची भावना ठेवत पालकांनी तिचे शिक्षणच बंद केले आहे. विशेष म्हणजे, तिच्या जबाबाला १४ दिवस उलटूनही तिला बालकल्याण समितीसमोर हजर केले नव्हते. जर वेळीच हजर केले असते तर […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी महाराष्ट्राचे ‘एआय’ नेतृत्व; सत्या नाडेला यांच्या उपस्थितीत ‘महाक्राइमओएस एआय’चे उद्घाटन
भारतामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या आव्हानावर मात करण्यासाठी, महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला यांच्या हस्ते आज मुंबईतील मायक्रोसॉफ्ट AI टूरमध्ये ‘महाक्राइमओएस एआय’ या विशेष प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. या निमित्ताने सत्या नाडेला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील डिजिटल सुरक्षा आणि एआय-आधारित […]
विधानभवनात बचत गटाच्या महिलांमध्ये वादावादी; शेजारी स्टॉल सुरु केल्याने पेटला वाद
नागपूर : विधिमंडळ परिसरात बचत गटांच्या स्टॉल वितरणादरम्यान गुरुवारी चांगलाच गोंधळ उडाला. दोन दिवसांपासून रिकामा ठेवलेल्या एका स्टॉलने अचानक सायंकाळी ‘भजे’ तळायला सुरुवात केली. शेजारील स्टॉलवर ग्राहकांची वाढती गर्दी पाहून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. यावरून ग्राहक ओढण्याच्या आरोपांमुळे दोन्ही बचत गटांच्या महिलांमध्ये वादावादी झाली. घटनेच्या वेळी अधिकारी व अभ्यागत उपस्थित असल्याने वातावरण अधिकच तापले. […]
राज्यातील पालिका निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी
‘अमिताभ हा बाॅलिवूडमधला बिग बी असेल तर देवेंद्र फडणवीस हे बिग डी आहेत. डी म्हणजे डिव्होशनचा, डेडिकेशनचा, डिटरमिनेशनचा अन् हा डी डेअरिंगचापण आहे. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी ते खंबीर असतात’… देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी हे उद्गार जाहीर कार्यक्रमात आणि फडणवीसांसमोरच नागपूरच्या थंडीत काढले. दोघांमधील संबंध गारठल्याचे चित्र असताना शिंदेंच्या वाक्यांनी अचानक ऊब […]
भाजप, शिंदेसेना मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक एकत्र लढवणार; एकनाथ शिंदे, चव्हाण यांची नागपुरात महत्त्वाची बैठक
नागपूर : मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकीबाबत शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी रात्री शिंदे यांच्या नागपूर येथील देवगिरी बंगल्यावर झाली. बुधवारी चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ही बैठक झाली. शिंदेसेना आणि भाजपने एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. […]
“माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही”; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
लोकसभेत भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी कोणाचंही नाव न घेता टीएमसीच्या एका खासदारावर सभागृहात ई-सिगारेट ओढल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणी टीएमसीचे खासदार सौगत रॉय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितलं की, भाजपा नेत्याच्या या विधानात कोणतंही तथ्य नाही. सौगत रॉय म्हणाले, “आरोप काही नाही, सभागृहाच्या आत सिगारेट पिण्यास मनाई आहे. […]
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
खरेतर स्वार्थी लोक वाढत चालले आहेत. समाज आणि देशाच्या हितासाठी बलिदान करण्याची तयारी कमी होत चालली आहे. आमच्यासारखे काही लोक आहे आणि बलिदान करतील असा मला विश्वास वाटतो. राळेगणमध्ये येथे कोणी झाडाची एक फांदी जरी तोडली तरी मला वेदना होतात. मी कुठेही कोणाला झाडे तोडू देत नाही. कुंभमेळासाठी येणारे साधूसंत हे जंगलात राहणारे असतात. ते […]
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
वाशिममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे समृद्धी महामार्गावर चालत्या कंटेनर मधून तब्बल २ कोटी ४३ लाखांच्या वॅक्सीनची रॉबरी केल्याची घटना समोर आली. ही चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिमपोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरी गेलेल्या वॅक्सीनचा मात्र अजूनही शोध घेतला जात आहे. या गुंन्ह्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली […]
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने….
राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे मतदान २ डिसेंबरला पार पडले. अनेक ठिकाणी वादावादी, मारामारी, बोगस मतदान झाले आहे. मतदानावेळी तणाव असतानाच एक बातमी येऊन ठेपली, ती म्हणजे या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला नाही तर २१ डिसेंबरला लावणार याची. यावरून राज्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. यामागे नेमके काय घडले, कोणी उच्च न्यायालयात याचिका […]
पोलिस पाटलांना किमान ४० हजार रुपये मानधन द्या
यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात पोलिस पाटलांची ४० हजार पदे आहेत. यापैकी ८ हजार पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांचा पदभार कार्यरत पोलिस पाटलांवर सोपविण्यात आला आहे. यामुळे एका पोलिस पाटलाला दोन ते तीन गावांची जबाबदारी आली आहे. असे असले तरी पोलिस पाटलांना निर्धारित मानधन वेळेवर मिळत नाही. शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकांसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च, वही, कागद […]










